Kolhapur | कोल्हापूर महापालिकेत 3 कोटी 14 लाखांच्या घरफाळा घोटाळ्याची फिर्याद, फिर्यादीच आरोपी?
घरफाळा घोटाळ्याचा आरोप होताच संजय भोसले यांनी चुकीच्या रकमा दाखवून चार कर्मचाऱ्यांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर या चारही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत 3 कोटी 14 लाखांचा घरफाळा घोटाळा झाल्याची फिर्याद करनिर्धारक संजय भोसले यांनी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात हा घोटाळा एक कोटी 48 लाख यांचा असल्याचं चौकशी अहवालात स्पष्ट झाल असून घोटाळ्यातील आठ पैकी सात प्रकरणात स्वतः संजय भोसले यांचा हात असल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केला आहे. घरफाळा घोटाळ्याचा आरोप होताच संजय भोसले यांनी चुकीच्या रकमा दाखवून चार कर्मचाऱ्यांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर या चारही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र यानंतर झालेल्या चौकशीत फिर्यादी असलेले संजय भोसले आरोपी असल्याचं दिसून येतंय.