VIDEO : Delhi | ओबीसी आरक्षणाबाबत राजधानी दिल्लीत परिषद, मोठ्या निर्णयाची शक्यता
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने आज दिल्लीत ओबीसी आरक्षण परिषद पार पडणार आहे. या परिषदेला राजद नेते लालूप्रसाद यादव आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सध्या महाराष्ट्रासह देशात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने आज दिल्लीत ओबीसी आरक्षण परिषद पार पडणार आहे. या परिषदेला राजद नेते लालूप्रसाद यादव आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सध्या महाराष्ट्रासह देशात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या परिषदेत मोठा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या परिषदेत ओबीसींची देशव्यापी जनगणना करण्याचीही मागणी उचलून धरली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मागणीसाठी रणनीती आखली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. शिवाय देशभरातील ओबीसींना एकत्र करून देशात ओबीसींची ताकद निर्माण करण्यावरही या परिषदेत चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.