Special Report | सदस्यांची दादागिरी, की भक्ताची आगळीक?
लालबागच्या पुलावरुन शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण कशामुळे म्हणून अनेकांनी सोशल मीडियात चिंतामणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न केले.....काहींनी चिंतामणी मंडळाच्या सदस्यांवर टीका केली. तर काहींनी. याला दादागिरी म्हटलं.
मुंबई : हा व्हिडिओ आहे मुंबईतील 103 वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळीतल्या चिंतामणी गणेश मंडळाच्या प्रवेशद्वारावरचा. मुंबईतल्या चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी उसळली. याआधी दर्शनाला गेलेल्या भाविकांचं दर्शन होऊन गर्दी कमी व्हावी,यासाठी बॅऱिकेट्स लावले गेले. त्याचदरम्यान बॅरिकेट्स हलले. तुफान गर्दी मंडपात शिरायला लागली आणि नेमकं तेव्हाच चिंतामणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली.
लालबागच्या पुलावरुन शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण कशामुळे म्हणून अनेकांनी सोशल मीडियात चिंतामणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न केले. काहींनी चिंतामणी मंडळाच्या सदस्यांवर टीका केली. तर काहींनी. याला दादागिरी म्हटलं.
मात्र नेमकं काय घडलं होतं., यासाठी आम्ही चिंतामणी गणेश मंडळाला विचारणा केली. मंडळाच्या दाव्यानुसार गर्दी आणि चेंगराचेगरीसारख्या घटना टाळण्यासाठी दर्शनाला महिला आणि पुरुष अश्या दोन स्वतंत्र रांगा केल्या होत्या. पण त्याच गर्दीचा फायदा अज्ञात व्यक्तीनं एका महिलेच्या गळ्यातले दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. म्हणून लोकांनी त्या अज्ञात व्यक्तीला प्रवेशद्वाराजवळच मारहाण केली.
दरम्यान, ज्या व्यक्तीला मारहाण झाली आणि ज्याच्यावर चोरीचे आरोप झाले. तो व्यक्ती त्याच गर्दीचा फायदा उचलत तिथून निसटून गेलाय.
आणि ज्या महिलेचे दागिने चोरण्याचे प्रयत्न झाला, ती महिला सुद्धा गर्दीतून निघून गेली. त्यामुळे ज्या व्यक्तीला मारहाण झाली. त्याची बाजू कळू
शकलेली नाही.