Video : दान गुप्त ठेवा उघड करू नका नाही तर ईडी मागे लागते- नाना पटोले
राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडीमधील (MVA) घटक पक्षाचे नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबद्दल वक्तव्य केलं आहे. दान गुप्त ठेवा उघड करू नका नाही तर ईडी (ED) मागे लागते असा उपरोधिक टोला नाना पटोले यांनी […]
राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईवरुन महाविकास आघाडीमधील (MVA) घटक पक्षाचे नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबद्दल वक्तव्य केलं आहे. दान गुप्त ठेवा उघड करू नका नाही तर ईडी (ED) मागे लागते असा उपरोधिक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. गोंदियातील कुनबी मेळाव्याच्या जाहीर सभेत नाना पटोले यांनी विधान केलं आहे.