VIDEO : Devendra Fadnavis | ‘फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन’
देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ही जुगलबंदी रंगली. आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्यासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जयंत पाटील बोलायला उभे राहिले.
देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ही जुगलबंदी रंगली. आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होती. त्यासाठी विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जयंत पाटील बोलायला उभे राहिले. त्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांना टोले लगावले. मी राज्यपालांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. गेले अनेक महिने विधानसभेला याची प्रतिक्षा होती. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी आमच्या सरकारकडून वारंवार विनंती करण्यात आली होती. आता राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत. महाराष्ट्र आणि देशाला राज्यपाल कसा आदर्श घालू शकतो हा एक आदर्श राज्यपालांनी घातला आहे.