VIDEO : Pankaja Munde | केंद्राच्या नव्या मंत्रीमंडळाचं मनापासून अभिनंदन – पंकजा मुंडे

| Updated on: Jul 09, 2021 | 2:35 PM

वंजारी समाजातील कोणी नेता मोठा होत असेल, तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. फक्त मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या, त्या पद्धतीने हाताळावं. कोणा गरीबाला वाटू नये, की हे साहेबांसारखं नाही, एवढी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.

“वंजारी समाजातील कोणी नेता मोठा होत असेल, तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. फक्त मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या, त्या पद्धतीने हाताळावं. कोणा गरीबाला वाटू नये, की हे साहेबांसारखं नाही, एवढी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. पंकजा आणि प्रीतम मुंडे म्हणजेच वंजारी समाज नाहीये, इतर लोकही आहेत. त्यामुळे आपली आणखी ताकद वाढेल, अशी शुभेच्छा.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या महाराष्ट्रातील चौघांपैकी तिघे बाहेरच्या पक्षातून आलेले आहेत, यावरुन पंकजांना प्रश्न विचारण्यात आला. “पक्ष वाढवण्यासाठी बडे नेते काही महत्त्वाचे निर्णय घेत असतात. विधानपरिषदेवरही काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

VIDEO : Pankaja Munde | टीम देवेंद्र पक्षाला मान्य नाही, पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 2 PM | 9 July 2021