PM Modi यांच्याविरोधात Congressची निदर्शने, पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
काँग्रेस कार्यकर्ते डोंबिवलीतील भाजप कार्यलयात जाण्याची तयारीत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज डोंबिवलीत काँग्रेसने पदाधिकरी कार्यकर्त्यानी सम्राट चौकात निदर्शने केली. यावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्ते डोंबिवलीतील भाजप कार्यलयात जाण्याची तयारीत असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर दुसरीकडे या आंदोलनाची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी कार्यकर्ते देखील भाजप कार्यलयाच्या बाहेर जमा झाले मोदींच्या समर्थनार्थ ,वंदे मातरमच्या जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.