लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवली, काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 22, 2024 | 1:43 PM

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवल्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय. विरोधी पक्षाला पंगू करण्याचा डाव असल्याचा आरोप केला गेलाय. तर भाजपने अनेकदा नोटीस दिल्यानंतरही काँग्रेसने पाठपुरावा काकेला नाही? असा सवाल काँग्रेसला केलाय

1993 आणि 1994 साली बजावलेल्या एका आयकरच्या नोटीसवरून आमची बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवल्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय. विरोधी पक्षाला पंगू करण्याचा डाव असल्याचा आरोप केला गेलाय. तर भाजपने अनेकदा नोटीस दिल्यानंतरही काँग्रेसने पाठपुरावा काकेला नाही? असा सवाल काँग्रेसला करण्यात येत आहे. 1993 आणि 94 साली सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यावेळी एक नोटीस बजावण्यात आली होती. 2017-18 साली काँग्रेसच्या आयकर रिटर्नमध्ये त्रुटी आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार, 14 लाख 40 हजाराच्या कराच्या हिशेबात अनियमितता होती. ती वाढत गेल्याने आयकर खात्याने काँग्रेसला 210 कोटींचा दंड ठोठावला. आयकर खात्याच्या कारवाईविरोधात काँग्रेसने हायकोर्टात धाव घेतली. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय झालं पुढे?

Published on: Mar 22, 2024 01:43 PM
सासरी नांदावं माहेरी लुडबूड…, नाव न घेता रूपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला
देवेंद्र फडणवीस यांचा मध्यरात्री 3 वाजता फोन; जरांगे यांचा पाटलांचा मोठा गौप्यस्फोट