Nagpur | नागपुरात संघ मुख्यालयाजवळ काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले

Nagpur | नागपुरात संघ मुख्यालयाजवळ काँग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले

| Updated on: Aug 01, 2021 | 7:03 PM

स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात ही रॅली आज नागपुरातून दिल्लीला रवाना होणार होती. त्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आज महाल परिसरातील संघ मुख्यालय जवळ पोहोचले होते.

नागपूर : संघ मुख्यालयाजवळ आज दुपारी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. “संघ मुख्यालय से संसद तक” या आशयाची एक रॅली युवक काँग्रेसच्या नागपूरातील काही कार्यकर्त्यांनी काढली होती. महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचा निषेध करत नागपुरातून दिल्लीपर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात ही रॅली आज नागपुरातून दिल्लीला रवाना होणार होती. त्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आज महाल परिसरातील संघ मुख्यालय जवळ पोहोचले होते. त्या ठिकाणी त्यांचा उद्दिष्ट संघ मुख्यालयाजवळील गल्लीतून जाण्याचा होता. मात्र, ही बाब स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना कळताच ते ही संघ मुख्यालय जवळ गोळा झाले. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे समोरासमोर आल्यानंतर शाब्दिक वादवादीला सुरुवात झाली.

उड्डानपुलाच्या उद्धाटनाला पालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी : रवी राजा
Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक