पुण्यात निवडणूक संपली तरीही बॅनरवॉर सुरू, ‘हू इज धंगेकर?’ला ‘धीस इज धंगेकर’ने प्रत्युत्तर
VIDEO | This is Dhangekar..., पुण्यात भाजप कार्यालयासमोर रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांचं जोरदार बॅनरवॉर
पुणे : कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले असून रवींद्र धंगेकर यांचा 11 हजार 40 मताधिक्यांनी विजय झाला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीदरम्यान, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांची खिल्ली उडवली होती. त्यांनी कोण आहेत धंगेकर? हु इज धंगेकर? असा सवाल केला होता. मात्र धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही टीका चांगलीच बोचली होती. कसब्यातील जनतेने धंगेकर यांच्या बाजूने कौल देताच आता कसब्यात जोरदार बॅनर वॉर सुरू झालं आहे. या बॅनरमधून चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रश्नावर त्यांना प्रत्युत्तर देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Mar 03, 2023 02:37 PM