सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेसचे विशाल पाटील ही ठाम ऱाहिलेत. त्यामुळे सांगलीत आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे संजय काका पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसेचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी लढत होणार
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांना बंड केलाय. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असतानाही ते लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. यामुळे विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गटासमोर मोठं आव्हानच उभं केलंय. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने काँग्रेसचे विशाल पाटील ही ठाम ऱाहिलेत. त्यामुळे सांगलीत आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे संजय काका पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसेचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी लढत होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विशाल पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न झालेत, मात्र विशाल पाटील यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. त्यामुळे विशाल पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने ठाकरेंचं टेन्शन चांगलंच वाढल्याची चर्चा आहे. बघा स्पेशल रिपोर्ट