महायुतीच्या ‘त्या’ जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमकी जाहिरात काय?

| Updated on: May 06, 2024 | 11:51 AM

भाजपच्या 'त्या' जाहिरातीविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. काँग्रेसने आक्षेप घेऊन केलेल्या तक्रारीनंतर आता भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात की पाकिस्तानात?

महायुतीच्या एका जाहिरातीवरून काँग्रसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या या जाहिरातीविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. काँग्रेसने आक्षेप घेऊन केलेल्या तक्रारीनंतर आता भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात की पाकिस्तानात? याच महायुतीच्या जाहिरातीवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलाय. काँग्रेसच नाहीतर उद्धव ठाकरे यांनी देखील महायुतीच्या त्याच जाहिरातीवरून भाजपवर निशाणा साधलाय. भाजपच्या पराभवानंतर देशात फटाके फुटणार असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. ‘दहा वर्ष झाल्यानंतरही तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे? भारतात की पाकिस्तानात? पण तुमच्या पराभवामुळे माझ्या हिंदुस्थानात पराभवाचे फटाके फुटणार आहेत आणि दुर्देवाने तुम्ही विजयी झालात तर चायनीज फटाके वाजतील.’, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Published on: May 06, 2024 11:51 AM
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल; ठाकरे गटाचं प्रत्युत्तर काय?
मला इंग्रजी येत नाही… रवींद्र धंगेकरांच्या साधेपणाला शशी थरूर यांची साद, असं केलं कौतुक