औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी, काँग्रेसच्या बडया नेत्याकडून आलमगीरासोबत फडणवीसांची तुलना अन्…

| Updated on: Mar 17, 2025 | 10:35 AM

राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे आणि यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांवर टीका केलेली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी आमनेसामने आले आहेत.

राज्यात एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा धक्कादायक आकडा समोर येत आहे. तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या कबरीवरून विरोधकांनी निशाणा साधला आहे. यावादात काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. ‘औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर’, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. इतकंच नाहीतर “औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्याने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. नेहमी औरंगजेब धर्माचा आधार घेत होता. तो कधी हजला गेला नाही. औरंगजेब जेवढा क्रूर शासक होता, आज फडणवीस सुद्धा तेवढेच क्रूर आहेत. फडणवीस देखील नेहमी धर्माचा आधार घेतात”, असंही त्यांनी म्हटलं.

दुसरीकडे राज्यातल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यांवर सरकार का बोलत नाही यावरूनही सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. माहितीनुसार गेल्या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात 2 हजार 706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्येत अमरावती जिल्ह्याची स्थिती सर्वात भयावह आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 952 शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले. चिंतेची गोष्ट म्हणजे नागपूर, नाशिक, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातही आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. तर ‘४०० वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेले आहेत. पण तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळालेल्या त्याच्यावर बोला. या महाराष्ट्रामध्ये तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता, शेतकऱ्यांनी आत्महत्या त्यावरती कोणाला संवेदना नाहीत’, असं संजय राऊत यांनी म्हणत सरकारवरच निशाणा साधलाय.

Published on: Mar 17, 2025 10:35 AM
Nashik Crime : नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; कारचालकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
बेशिस्त, मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही शिवीगाळ अन् बेदम मारहाण, बघा व्हिडीओ