महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती, अंतर्गत वादावर हायकमांडचा मोठा निर्णय, बघा व्हिडीओ
VIDEO | महाराष्ट्र काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फैसला बाकी? हायकमांडने घेतला मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिल्लीत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान कोर्टात आज दोन्ही गटाचा युक्तिवाद संपलाय. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाऊ शकतं किंवा निकालाची कधीही घोषणा होऊ शकते. या घटनेपाठोपाठ दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आणखी महत्त्वाची घडामोड घडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद मध्यंतरी उफाळून आला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील सध्याच्या अंतर्गत गटबाजी आणि वादाची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस अतिशय सावधपणे पाऊल टाकणार आहे. राज्यातील काँग्रेसच्या परिस्थितीचा हायकमांड आढावा घेणार आहे. हा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राकडून रमेश चेंनिथलांची नेमणूक करण्यात आली आहे.