‘मविआ’त मुख्यमंत्री कोणाचा होणार? दिल्लीच्या काँग्रेस हायकमांडच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

| Updated on: Jun 27, 2024 | 11:05 AM

२०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत फिस्कटलं होतं पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे पक्ष आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसने भूमिका स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले.

Follow us on

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचं पाहायला मिळाले. यानंतर दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडची बैठक झाली. त्या बैठकीत महाविकास आघाडी एकत्र लढण्याचं ठरलं. तसंच ज्या पक्षांचे आमदार अधिक त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच दिला जाणार नाही, असंही काँग्रेसने ठरवलं आहे. यासह जुलै महिन्याच्या अखेरीस जागा वाटप पूर्ण व्हावं…असं काँग्रेसच्या बैठकीत ठरलंय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे पक्ष आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसने भूमिका स्पष्ट केल्याचे पाहायला मिळाले. २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत फिस्कटलं. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत….मात्र आता मुख्यमंत्रीपदावरून वाद नको म्हणून ज्याचे अधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री… असं मविआमध्ये ठरलंय.