काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याच्या तयारीत

| Updated on: Jan 09, 2022 | 10:48 PM

राज्यात सरकार चालवताना जरी तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील वाद कधी लपले नाहीत, त्यामुळेच काँग्रेस आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.

मुंबई : राज्यात येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे, काँग्रेसही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत जोमाने उतरणार आहे. त्यासाठी काँग्रेसने आत्तापासूनच जोरदार तायरी सुरू केली आहे, काँग्रेसने स्थानिक पातळीवर उमेदवारांची चाचपणी आत्तापासूनच सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेसकडून हलचाली वाढल्या आहेत, नाना पटोलेंसारखा आक्रमक प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला बऱ्याच वर्षांनी मिळाला आहे, नाना पटोलेंनी राज्याची सुत्रं हाती घेतल्यापासूनच 2024 पर्यंत काँग्रेसला राज्यातला नंबर एकचा पक्ष बनवण्याचा विडा उचलला आहे. तीच पटोलेंची आक्रमकता आत्ताही दिसू लागली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे समोर येत आहे.

खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा, नवी मुंबईत 4 दिवसात तब्बल 1390 पोलिसांना कोरोना
ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको-डॉ. भागवत कराड