काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?

| Updated on: Mar 29, 2024 | 5:23 PM

तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, असं ही काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ५ जागांवर महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?

राज्यातील पाच जागांवर काँग्रेस अद्याप ठाम आहे. सांगली, भिवंडी, मुंबई उत्तर पश्चिम या जागेवर काँग्रेस ठाम आहेत. यासबोत इशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य या जागेवरही काँग्रेस ठाम असल्याचे सांगितले जात आहे. तर तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, असं ही काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ५ जागांवर महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे. महाविकास आघाडी तोडायची नाही पण ठाकरे आणि पवार गटाच्या दबावापुढे झुकायचं नाही असा सूर काँग्रेसच्या बैठकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, या निर्णयाबाबत दिल्ली हायकमांडला राज्यातील काँग्रेस नेत्यांनी माहिती दिली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Published on: Mar 29, 2024 05:23 PM
Video : संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास