अशोक चव्हाण यांनी मविआच्या जागावाटपात जाणूनबुजून घोळ घातला? काँग्रेस नेत्यांना संशय?
महाविकास आघाडीत जागावाटपाचा जो पेच निर्माण झालाय त्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत, असा दावा काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना दावा केलाय. याबाबत सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. जागावाटपात अशोक चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती पण..
लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्या तरी मात्र महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये. दरम्यान, महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झालाय. विशेष म्हणजे जागावाटपाचा हा तिढा काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते अशोक चव्हाण यांच्यामुळे निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा जो पेच निर्माण झालाय त्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत, असा दावा काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना दावा केलाय. याबाबत सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. जागावाटपात अशोक चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती. अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या पारंपरिक जागांवर दावा केला नाही. त्यांनी पारंपरिक जागांवर दावा करायला हवा होता, असं मत काँग्रेस नेत्यांनी खासगीत बोलताना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी जाणूनबुजून हा घोळ केला, असा काँग्रेस नेत्यांना संशय असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.