पालिकेच्या निवडणुका जवळ, काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरु : अमित देशमुख
औरंगाबाद महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढावं ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि निश्चित त्याचा विचार केला जाईल, असे अमित देशमुख म्हणाले.
औरंगाबाद : नाना पटोले यांच्यानंतर अमित देशमुख यांनीही स्वबळाचे संकेत दिले आहेत. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याची इच्छा असते. आपला पक्ष मोठा असावा हे प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करणं काहीही गैर नाही. स्वबळाच्या नाऱ्याचा गैर अर्थ काढणं चुकीचं आहे, आमच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. औरंगाबाद महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढावं ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि निश्चित त्याचा विचार केला जाईल, असे अमित देशमुख म्हणाले.