अशोक चव्हाण यांचं राजीनाम्यानंतर पहिलं टि्वट; म्हणाले, मी भोकर विधानसभा…
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई, १२ फेब्रुवारी, २०२४ : काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. तर येत्या १५ फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असून त्यांच्या भाजप पक्षप्रवेशांचा मोठा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पहिलं ट्वीट केले आहे. अशोक चव्हाण यांनी ट्वीटद्वारे म्हटले की, आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.