Phone Tapping प्रकरण गंभीर, पेगासीसपेक्षा भयानक काम महाराष्ट्रात : Atul Londhe

Phone Tapping प्रकरण गंभीर, पेगासीसपेक्षा भयानक काम महाराष्ट्रात : Atul Londhe

| Updated on: Feb 28, 2022 | 6:59 PM

नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना लोकांवर पाळत ठेवण्याचे, त्यांचे खासगी संभाषण चोरून ऐकण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते.

नागपूर : फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग (Phone Tapping) झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. पण रश्मी शुक्ला या एक प्यादं आहेत त्यांना फोन टॅपिंगचे आदेश देणारे कोण होते? हे समोर येणे आवश्यक आहे, त्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केली आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना लोकांवर पाळत ठेवण्याचे, त्यांचे खासगी संभाषण चोरून ऐकण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

पुतिन हे 21 व्या शतकातील हिटलर, यूक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्याचं वक्तव्य
SambhajiRaje यांचं आझाद मैदानावरील Maratha Reservation मुद्द्यावर सुरू असलेले उपोषण मागे