आमची संधी घालवली हे खरंय पण…, बाळासाहेब थोरात यांनी सल व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचं केलं जाहीर कौतुक

| Updated on: Mar 18, 2023 | 8:12 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भर जाहीर सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव, बघा व्हिडीओ काय म्हणाले...

नाशिक : “एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्री आहात. संधी मिळालेली आहे. काम करताय. आमची संधी घालवली हे खरंय. पण गडी मेहनती आहे हे विसरुन जाता येत नाही. जो काही वेळ मिळाला आहे, जी संधी मिळाली आहे ती त्या संधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न आपण करत आहात ते आम्ही मनापासून पाहतोय ते नाकारता येत नाही”, असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाची स्तुतीसुमनं उधळली आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भर मंचावर आपल्या मनातील सल देखील व्यक्त करुन दाखवली.

Published on: Mar 18, 2023 07:56 PM
एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्यापेक्षा…, सुषमा अंधारे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी कांतारा स्टाईलनं आंदोलन, कर्मचाऱ्यांची भूमिका काय?