राजीनामा दिलाच नव्हता? अखेर बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं, नेमकं काय म्हणाले बघा…

| Updated on: Feb 25, 2023 | 9:04 PM

VIDEO | काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा देण्यावरून काय दिले स्पष्टीकरण, काय म्हणाले बघा व्हिडीओ

प्रदीप कापसे, छत्तीसगड : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याची बातमी चांगलीच चर्चेत होती. मात्र आता यावर स्वतः बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं आहे. रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यावेळी ते म्हणाले, आपण राजीनामा दिला असं कोणी सांगितलं?, बाळासाहेब यांनी घेतलेल्या या यु-टर्नमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असे दोन गट पक्षात पडले. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी थेट दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांकडे नाना पटोले यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता बाळासाहेब थोरात काय म्हणताय बघा व्हिडीओ…

Published on: Feb 25, 2023 09:04 PM
कुपोषित बालकांबरोबर मैत्री करून काय फायदा?, गुलाबराव पाटील यांनी कुणाला लगावला खोचक टोला
‘या’ जिल्ह्याचं नाव होणार अहिल्यानगर, केंद्राकडे पाठपुरावा करणार; राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय दिला शब्द?