‘हे दुर्देवी…’, म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुराष्ट्र या विधानावर काँग्रेसच्या बड्या नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: Apr 14, 2023 | 2:27 PM

VIDEO | 'राज्य घटनेची शपथ घेऊन काही जण...', काँग्रेसच्या बड्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा

अहमदनगर : कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन केल. या अभिवादन कार्यक्रमास जयश्री थोरात‌ यांचीही उपस्थिती दिसुन आली. आज डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मानवतेसाठी समतेचा संदेश बाबासाहेबांनी दिला. दुर्दैवाने राज्य घटनेची शपथ घेऊन काही जण वेगळी भाषा बोलतायत. कोणा एकाची सत्ता, कोणा एकाच राष्ट्र असले पाहिजे अशी भाषा वापरताय हे दुर्देवी आहे. या पद्धतीने देश पुढं जाणार नाही. राज्य घटनेची जागृती करण हाच संदेश आज दिला पाहिजे, असं मत थोरातांनी यावेळी व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुराष्ट्र या विधानावर थोरात यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Published on: Apr 14, 2023 02:24 PM
राऊत यांच्या ऑफरवर शेलारांची बोचरी टीका, पहा काय म्हणाले…
आदित्य ठाकरे बोललेत म्हणजे खरं, शिंदे ढसा ढसा रडले; ठाकरे गटाच्या नेत्याचा दुजोरा