Balasaheb Thorat यांचा हल्लाबोल, ‘भाजपनं खोटेनाटे आश्वासन दिले अन् सत्तेत जाऊन बसले’

| Updated on: Sep 07, 2023 | 1:16 PM

VIDEO | या देशात येणाऱ्या काळात लोकशाही आणि राज्यघटना राहणार की नाही? भारतीय जनता पक्षाने खोटेनाटे आश्वासन देऊन सत्तेत जाऊन बसल्याचे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला भाजपवर हल्लाबोल

नाशिक, ७ सप्टेंबर २०२३ | देशातील वाढती महागाई, बेरोजगारी याच्या निषेधार्थ, केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण असल्याचा आरोप करत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात झाली. नाशिकमध्ये जन संवाद यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसची सभा पार पडली. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढी हे उपस्थित होते. या यात्रेच्या माध्यमातून नाशिकमध्ये काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावेळी सभेत बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. ‘एकेकाळी नाशिक जिल्ह्यात संपूर्ण आमदार, खासदार काँग्रेसचे असायचे. या नाशिक जिल्ह्याने बिनविरोध यशवंतराव चव्हाण यांना लोकसभेत पाठवले’, असे म्हणत आपली ताकदीची राज्यघटना आहे. भविष्य काळात या देशात लोकशाही, राज्यघटना राहणार की नाही? याबद्दल खंत व्यक्त केली. तर भाजपवर जोरदार निशाणाही साधला.

Published on: Sep 07, 2023 01:16 PM
‘मराठा आंदोलनाची भेट म्हणजे राज ठाकरे यांची चमकोगिरी’, कुणाचा हल्लाबोल?
G20 Summit | राजधानी दिल्ली G20 शिखर परिषदेसाठी सज्ज, कशी सुरूये तयारी Watch Video