सत्यजित तांबे काँग्रेसचा आमदार असता तर…, बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
VIDEO | भविष्यात तांबे पिता-पुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये दिसणार का? काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया....
अहमदनगर : भविष्यात तांबे पिता-पुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये दिसणार का? यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विचार हा रक्तात असतो. डॉ. तांबे यांनी जे नेतृत्व केलं ते विचारांनी केलेले आहे. त्यांचा विचार हा पुरोगामी राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, पक्ष आणि पक्षाचे विचार पुढे नेण्यासाठी या सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागतील, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजीवर चर्चा सुरू आहे, यावर बोलताना थोरात म्हणाले, ज्याचं त्याचं जे काम असतं ते ते लोकं करत असतात. पण पक्षाचा मोठा माणूस मिळवणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं असे म्हणत खोचक टीकाही त्यांनी केली. गेल्या काही दिवसांपूर्वी सत्यजित तांबे म्हणाले काँग्रेसमध्ये असतो तर शिक्षक पदवीधर मतदारसंघातील विजयाचा जास्त आनंद झाला असता, याबाबत थोरातांनीही अशीच प्रतिक्रिया दिली ते म्हणाले सत्यजित तांबे काँग्रेसचा आमदार असता तर तो उत्साह जास्त असता…