Special Report | इंधनाचे दर वधारले, काँग्रेसचं आंदोलन कोसळलं
इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे (Congress Leader Bhai Jagtap collapsed during protest in Mumbai)
इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत हे आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेलच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या आंदोलनावर भाजप नेत्यांकडून टीका-टिप्पण्या सुरु आहेत (Congress Leader Bhai Jagtap collapsed during protest in Mumbai)