रस्त्यावर येण्याची भाषा फडणवीसांनी करू नये : भाई जगताप
"काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याचा विषयच नव्हता. आमच्याकडे पहिल्या उमेदवारानंतर 17 मत जास्त आहेत. आमचे अपक्ष आमदार मित्र आहेत. ते आम्हाला मदत करतील" असं मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
मुंबई: “काँग्रेसकडून अर्ज मागे घेण्याचा विषयच नव्हता. आमच्याकडे पहिल्या उमेदवारानंतर 17 मत जास्त आहेत. आमचे अपक्ष आमदार मित्र आहेत. ते आम्हाला मदत करतील” असं मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. “महाविकास आघाडीत कोणतीच बिघाडी नाही, जे झालं त्याची कारण आम्ही शोधतोय. आमचे सर्व सहा उमेदवार विजयी होतील” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. “रस्त्यावर येण्याची भाषा फडणवीसांनी करु नये. फडणवीसांच्या काळातील डेटामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालाय” असं भाई जगताप म्हणाले.
Published on: Jun 13, 2022 06:51 PM