Husain Dalwai : ‘औरंगजेबने संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे…’, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप

| Updated on: Mar 25, 2025 | 3:41 PM

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद सुरू असताना आता काँग्रेस नेते हुसैन दलावई यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटलाय. अशातच काँग्रेस नेते हुसैन दलावई यांनी एक खळबळजनक आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेबने संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारलं, असं वक्तव्य काँग्रेस नेते हुसैन दलावई यांनी केलं. संभाजी महाराज यांना मारण्याची पद्धत मनुस्मृतीप्रमाणे पंडितांनी सांगितली असंही हुसैन दलावई यांनी म्हटलंय. तर इतिहासाचा हा पैलू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य करतील का? असा थेट सवाल देखील हुसैन दलावई यांनी उपस्थित केला आहे. तर वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही, असं मत हुसैन दलावई यांनी व्यक्त केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी आलमगीर औरंगजेबाचा इतिहास वाचावा. औरंगजेबाने शंभू महाराजांचा ज्यापद्धतीने मारलं ती क्रूरता होती. त्याच्या भावाला देखील त्याने तसंच मारलं. पण शंभू महाराजाला मारण्याच्या संबंधामध्ये आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारायचं हे मनुस्मृतीमध्ये पंडितांनी जसं सांगितलं तसं त्यांना मारलं गेलंय’, असं हुसैन दलावई यांनी म्हटलंय.

Published on: Mar 25, 2025 03:33 PM
दिशा सालियन प्रकणात आदित्य ठाकरे फसणार? अ‍ॅड. निलेश ओझा यांनी थेट आरोपींची नावंच सांगितली, म्हणाले…
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक