सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? उद्धव ठाकरेंचं वाढवलं टेन्शनी

| Updated on: Apr 17, 2024 | 12:23 PM

सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं. बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आता पर्यंत चार अर्ज दाखल केलेत. आणि काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर निवडून येणार असा इशारा ठाकरेंनी दिलाय. सांगली, माढा, कोल्हापूर, सोलापूरात शक्तिप्रदर्शन करंत उमेदवारी अर्ज भरले

पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं. बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आता पर्यंत चार अर्ज दाखल केलेत. आणि काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर निवडून येणार असा इशारा ठाकरेंनी दिलाय. सांगली, माढा, कोल्हापूर, सोलापूरात शक्तिप्रदर्शन करंत उमेदवारी अर्ज भरले. तर सांगलीत काँग्रेसकडून आग्रही असलेल्या विशाल पाटील यांनी ठाकरे गटाचं टेन्शन वाढवल्याचे पाहायला मिळाले. ठाकरेंकडून चंद्रहार पाटील मैदानात असताना महाविकास आघाडीत विशाल पाटलांनी आव्हान उभं केलंय. सांगलीत भाजपच्या संजयकाका पाटलांचा सामना महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांशी आहे. तर बंडखोरी किंवा गद्दारी झाल्यास त्या-त्या पक्षांची जबाबदारी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 17, 2024 12:16 PM
सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे… शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांचा सवाल
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा कचा कचा… अजितदादांची फुल बॅटिंग