मतदानाच्या दिवशी अचानक 76 लाख मतं आली कुठून? वाढलेल्या मतांच्या टक्क्यावरून वादंग

| Updated on: Nov 29, 2024 | 10:36 AM

मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ७६ लाख मतदान कसं झालं? जे आजवर कधीही घडलं नाही ते महाराष्ट्रात कसं घडलं? यावर सवाल करत विरोधकांनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरणाचं आव्हान केलं आहे.

ईव्हीएम बरोबरच काँग्रेसच्या नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्याचं आव्हान दिलं आहे. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत ७६ लाख मतदान कसं झालं? जे आजवर कधीही घडलं नाही ते महाराष्ट्रात कसं घडलं? यावर सवाल करत विरोधकांनी निवडणूक आयोगाला स्पष्टीकरणाचं आव्हान केलं आहे. त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती प्रभाकर यांनी मतदानाच्या दिवशी पाच वाजेनंतर मतदानाचा टक्का वाढल्याची शंका उपस्थित केल्यानंतर विरोधकांच्या आरोपांना बळ मिळालं आहे. गेल्या २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. तर निकालापर्यंत तीन वेळा मतदानाची टक्केवारी अपडेट झाली. निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के, २० नोव्हेंबर रात्री ११. ५३ मिनिटांनी ६५.०२ टक्के तर २२ नोव्हेंबर रोजी अंतिम टक्केवारी ६६, ०५ टक्के मतदान झाल्याचे सांगितले. दरम्यान, संध्याकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत वाढलेल्या मतांच्या टक्क्यावरून वादंग सुरू झालं आहे. ऐरवी प्रथेप्रमाणे निकालानंतर केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देतं. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला पाच दिवस होऊनही निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन शंकेचं निरसन का केलं नाही? असा सवाल विरोधक करताय.

Published on: Nov 29, 2024 10:35 AM