‘लाडकी बहीण’च्या तोडीस तोड नवी योजना येणार, 1500 नाहीतर इतकी रक्कम मिळणार? नाना पटोलेंची मोठी घोषणा

| Updated on: Sep 06, 2024 | 3:02 PM

सध्या राज्यात सराकरच्या एकाच योजनेचा बोलबाला सुरू आहे, ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना... या योजनेच्या माध्यमातून ज्यांचं उत्पन्न वार्षिक अडीच लाखांपेक्षा कमी आहे. त्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. अशातच आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॉन्क्लेव्हमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुलाखत घेण्यात आली, यावेळी त्यांनी नव्या योजनेची घोषणा केली. ‘राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी योजना काँग्रेस आणेल. त्याचं नाव महालक्ष्मी योजना असून महिलांना दर महिन्याला 3000 रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला 1000 रुपये वाढवू, ‘, अशी घोषणा त्यांनी केली. नाना पटोले म्हणाले, आम्ही या योजनेचं स्वागत केलं आहे. फक्त ती कायम राहावी. भगिनींची दिशाभूल होऊ नये. बँकेत पैसे गेले. बँकेवाल्यांनी ते गायब केले. आता हे लोक इव्हेंट ककरत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट करत आहेत. पण भगिनींना बँकेत किती त्रास आहे माहीत आहे का. आम्ही या पेक्षा चांगली योजना आणणार आहोत. आम्ही महालक्ष्मी योजनेच्या नावाने योजना आणू. 3 हजार रुपये देऊ. दरवर्षी 1 हजार त्यात वाढवू. आम्ही सक्षम सरकार आणून ही योजना देणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

Published on: Sep 06, 2024 03:02 PM
‘टप्प्यात येण्याआधी बोलायचं नसतं’, जयंत पाटील मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
‘लाडकी बहीण’ दादांचीच? अजित पवारांनी ती योजना हायजॅक केली? मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?