Nana Patole : ‘नागपूरहून मी आणि देवेंद्र फडणवीस सोबतच मुंबईला…’, नाना पटोले असं का म्हणाले?

| Updated on: Nov 22, 2024 | 1:03 PM

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेसचा विजयाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक असणार आहे. इतकंच नाहीतर महाविकास आघाडी येत्या २५ तारखेला राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले

गेल्या दोन वर्षातील महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता आता झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणाची सत्ता स्थापन होणार? सत्ता स्थापनेवर कोण दावा करणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशातच विविध संस्थांकडून समोर आलेल्या एक्झिट पोलकडून वेगवेगळे अंदाज बांधण्यात आले आहेत. तर विविध पक्षांकडून सत्ता स्थापनेचा आणि विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तर विजयाचा गुलाल नेमका कोण उधळणार याचा फैसला उद्याच निकाल समोर आल्यानंतर होणार आहे. तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेसचा विजयाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक असणार आहे. तर हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात गडबड होऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. इतकंच नाहीतर महाविकास आघाडी येत्या २५ तारखेला राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत. महाविकास आघाडीकडे तरुणांसह लाडक्या बहिणींचा सुद्धा कौल आहे, असे नाना पटोले म्हणाले. तर माध्यमांच्या प्रतिनिधींनी नाना पटोले यांना मुंबईला कधी जाणार असा सवाल केला असता त्यांनी यावर मिश्किलपणे भाष्य करत उत्तर दिलं आहे. बघा काय म्हणाले नाना पटोले?

Published on: Nov 22, 2024 01:02 PM
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Raut : ‘एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय’; मविआला किती जागा? थेट आकडा सांगत राऊतांचा दावा