Nana Patole | भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांचा काय संबंध? नाना पटोलेंचा सवाल

Nana Patole | भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवारांचा काय संबंध? नाना पटोलेंचा सवाल

| Updated on: Jul 09, 2021 | 6:09 PM

मंत्रिमंडळ विस्तारात कुणी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं, पण इंजिनंच बदलणे गरजेचं होतं, डब्बे बदलले जात आहे. मोदीलाच बदलवण्याची वेळ देशात आलीय. (congress leader nana patole reaction on bhima koregaon and sharad pawar)

नागपूर : राज्यात लसीचा तुटवडा हे मोदी सरकारचं पाप आहे. पाकिस्तानला लसीचा पुरवठा केला आणि आता आपल्याकडे लस नाही. लोकांचा जीव जातोय. हे भाजपचं अपयश आहे. लस नाही हा राज्याचा नाही तर केंद्राचा दोष आहे, हे काही दिवसांत फडणवीसंही बोलतील. मंत्रिमंडळ विस्तारात कुणी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं, पण इंजिनंच बदलणे गरजेचं होतं, डब्बे बदलले जात आहे. मोदीलाच बदलवण्याची वेळ देशात आलीय. लोकलशिवाय लोकांची गैरसोय होत आहे हे सरकारला कळतेय, पण कोरोना महामारीत गॅदरिंग होता कामा नये. कोरोना वाढू नये म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतात. भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शरद पवार यांची चौकशी होण्याचं कारण नाही. जे कुणी या प्रकरणात होते, एकबोटे आणि संभाजी भिडे यांची चौकशी व्हावी, त्यात शरद पवार यांचा काय संबंध? महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक आहे आणि राज्यभर आंदोलन करत आहेत.