Nana Patole | कॉंग्रेसला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही – नाना पटोले
आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यावर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला.
मुंबई: काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ममतादीदी काल मुंबईत आल्या. त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या. या सर्व घडामोडींमध्ये एक लक्षात येतंय की काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन काँग्रेस विरोधी पक्षांची एक अलायन्स करण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत. त्याला पवारांची साथ दिसत आहे. त्यावर काल काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यावर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला.