Nana Patole Video : आधी एकनाथ शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, ‘मी तर…’
आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हणत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ऑफर दिली. यामुळे राजकीय वातावरण तापणार असून महायुतीकडून काय उत्तर मिळणार याकडे आता लक्ष लागून असताना आता पटोलेंनी यु-टर्न घेतला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर देत आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, असे नाना पटोलेंनी म्हटले होते. इतकंच नाहीतर तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर देत त्यांची अवस्था फार वाईट आहे. पुढच्या काळात त्यांचा पक्ष टिकेल की नाही माहीत नाही. भाजप त्यांना जगू देत नाही, असं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता यासंदर्भात त्यांनी पुन्हा एक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. ‘मुख्यमंत्रिपदाबाबत मी गमतीने म्हटलं पण सरकारने गांभीर्याने घेतलं’, असं नाना पटोले आज म्हणाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण करू, असं गमतीने म्हटलं होतं असं नाना पटोले म्हणाले. तर माझ्या विधानाला त्यांच्याच नेत्यांनी दुजोरा दिल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.