Ladki Bahin Yojana : नक्की जाहीरात सरकारची की अजित पवारांची? दादाच 1500 रूपये देतायत! राष्ट्रवादीची ‘ती’ जाहीरात वादात
अजित पवारच महिलांना १५०० रूपये देत आहेत. अशा आशयाची जाहीरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आल्यानंतर महायुतीत लाडकी बहीणवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे, अशी टीका काँग्रेसकडून कऱण्यात आली आहे. घा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
अजित पवार यांच्या गटाकडून लाडकी बहीण योजनेची करण्यात आलेली जाहीरात सध्या वादात आहे. या जाहिरातीत १५०० रूपये अजित पवार देत आहेत आणि योजनासुद्धा अजित पवार यांची असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच सरकार १५०० रूपये देत नाहीत तर ते अजित पवार देतायतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही तर जाहिरातीत मुख्यमंत्री शब्द वगळून अजितदादांचा उल्लेख लाडकी बहीण योजनेत कऱण्यात आला आहे. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे वडील मुलीला विचारताय की नवा ड्रेस कुणी दिला? त्यावर मुलगी अजितदादांनी दिल्याचे सांगते तर पत्नीही एफडीची माहिती देताना अजित दादांनी १५०० रूपये दिल्याचे सांगते. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीत वाद सुरू झाला ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. असा टोला शरद पवार यांनी लावला. तर बहिणींच्या नावाने मतं मिळवण्यासाठी श्रेयवाद सुरू झाल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट