मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Jan 22, 2022 | 7:19 PM

अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झालेत, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय आखाडा पुन्हा तापला आहे. पाच राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष जोमाने उतरले आहेत, उत्तर प्रदेशात सध्या योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नाशिक : देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकीवरून (Five State Elections) राजकाण तापलंय. त्यात भाजपमध्ये होणाऱ्या बंडखोरीने आणखी खतपाणी घातलं आहे. अशातच काँग्रेसकडून (Congress) चारी बाजुंनी भाजपला (Bjp) घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे, त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो असे वक्तव्य केले आहे. देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचंय. मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झालेत, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय आखाडा पुन्हा तापला आहे. पाच राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष जोमाने उतरले आहेत, उत्तर प्रदेशात सध्या योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Disale Guruji यांचा मार्ग मोकळा, परदेशात जाण्यासाठी परवानगी देण्याचे Varsha Gaikwad यांचे आदेश
Breaking | 5 राज्यांमध्ये 31 जानेवारीपर्यत रॅली, रोड शोवर बंदी असणार-TV9