आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

| Updated on: May 13, 2024 | 9:36 AM

नंदूरबार येथे झालेल्या जाहीर सभेतून प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावरूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. पाकिस्तान आणि बांगलादेश फाळणीचा दाखला देत प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका केली. बघा काय केला हल्लाबोल?

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्यासारखं धैर्य दाखवावं, असं म्हणत त्यांनी मोदींना एकप्रकारे आव्हानच दिलं आहे. दरम्यान, याच आव्हानानंतर भाजप नेत्यांकडून प्रियंका गांधी यांना आव्हान दिलंय. नंदूरबार येथे झालेल्या जाहीर सभेतून प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावरूनच भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. पाकिस्तान आणि बांगलादेश फाळणीचा दाखला देत प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका केली. तर ‘मोदींच्या मागे जनता आहे. त्याचा देशभरात डंका वाजतोय. प्रियंका गांधींनी बोलतांना तारतम्य ठेवलं पाहिजे.’, असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं. बघा स्पेशल रिपोर्ट प्रियंका गांधींनी नेमका काय केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात…

Published on: May 13, 2024 09:36 AM
अजित दादांवरच्या ‘त्या’ आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
तरच मतदान करणार… बीडच्या केज तालुक्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार