Rahul Gandhi : …म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, RSS वर बोट उगारत राहुल गांधींचा मोठा आरोप
राहुल गांधींनी बीड अन् परभणीच्या घटनेतील पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. पिडीत कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला नाही तर....
काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज सोमवारी परभणी आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राहुल गांधींनी बीड अन् परभणीच्या घटनेतील पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. पिडीत कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला नाही तर त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या पोलिसांनीच केली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.’सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी २० ते २५ मिनिटे चर्चा केली. त्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा शवविच्छेदन अहवाल पाहिला आहे. त्यांचे व्हिडिओ आणि फोटो पहिले आहे. ते पाहिल्यानंतर शंभर टक्के त्याचा मृत्यू पोलीस कठोडीत झाला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता, असे राहुल गांधी म्हणाले. तर सोमनाथ सूर्यवंशी दलित आहे. ते संविधानाचे संरक्षण करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधान संपवण्याची आहे. त्यामुळे त्यांना मारण्यात आले. यामुळे या घटनेला मी त्यांचा खून करण्यात आला आहे, असे म्हणणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हणत जोरदार हल्लाबोल केला.