Breaking | कॉंग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनीतालमधील घराला आग लावून केली दगडफेक
खुर्शीद यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ खुर्शीद यांनी प्रसिद्ध केला, ज्यात कथित हल्लेखोर तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करताना दिसत आहेत. हल्लाचे फोटो शेअर करत, “हा हिंदू धर्म असू शकत नाही असे म्हणणे मी अजूनही चुकीचे आहे का?”, खुर्शीद यांनी लिहीलं.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर सोमवारी हल्ला झाला. त्यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ मध्ये हिंदुत्वाची तुलना ISIS आणि बोको हराम सारख्या कट्टरपंथी जिहादी गटांशी केल्यानंतर देशभरात वाद सुरू आहे. खुर्शीद यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ खुर्शीद यांनी प्रसिद्ध केला, ज्यात कथित हल्लेखोर तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करताना दिसत आहेत. हल्लाचे फोटो शेअर करत, “हा हिंदू धर्म असू शकत नाही असे म्हणणे मी अजूनही चुकीचे आहे का?”, खुर्शीद यांनी लिहीलं.