राम मंदिर हा भाजप अजेंडा, काँग्रेसच्या बड्या नेत्याची थेट टीका

| Updated on: Jan 12, 2024 | 6:45 PM

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येतील या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा इव्हेंट केला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर, १२ जानेवारी, २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्येसह देशभरात राम मंदिर निर्माणाचा आनंद साजरा करणार आहे तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने योगदान देताना दिसतोय. दरम्यान, अयोध्येतील या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा इव्हेंट केला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राम मंदिर हा भाजप, हिंदू महासभा आणि आरएसएसचा अजेंडा आहे. ते सुरुवातीपासूनच आहे त्यात नवीन काही नाही. त्यांनी रामनवमीच्या ऐवजी 22 तारखेला अयोध्येतील रामाच्या मंदिराचं लोकार्पण का करावसं वाटतं माहित नाही…पण ठीके असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी यावर जास्त भाष्य केले आहे.

Published on: Jan 12, 2024 06:45 PM