चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ ट्विटवर काँग्रेसचे नेते उस्मान हिरौली यांचं स्पष्टीकरण
VIDEO | चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उस्मान हिरौली यांना केलं टार्गेट, काय म्हणाल्या चित्रा वाघ आणि काय दिलं उस्मान हिरौली यांनी स्पष्टीकरण, बघा व्हिडीओ
पुणे : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरुन पवार साहेबांच्या उपस्थितीत थेट मुस्लिमांना आवाहन केल जातंय आणि दुबई, सौदीतून मतदार आणा म्हणतात, मेलेल्यांनाही ‘जंग’साठी ‘हाजीर’ करा म्हणताय, इतकी वाईट अवस्था राज्यात राष्ट्रवादीची कधीच नव्हती, हा तर एकप्रकारे जिहादच..! असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. पुण्यात भाजपने अल्पसंख्याक मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते.कसब्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी मुस्लिमांना मतदानासाठी आवाहन करणारं भाषण केलं. या वादग्रस्त भाषणानंतर उस्मान हिरौली यांच्यावर टीका होऊ लागल्याने हिरौली यांनी आता यावर स्पष्टीकरण देत बचावाची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. बघा काय दिलं उस्मान हिरौली यांनी स्पष्टीकरण…