लोकसभा निकालाआधीच वडेट्टीवारांचा मोठा दावा, महाराष्ट्रात भाजपला किती जागा? थेट सांगितला आकडा
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे चार दिवस बाकी असताना काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. सगळीकडे भाजपला फटका बसतोय. भाजपला राज्यात ८ जागा मिळतील तर मोदी सरकारला हटवणं हाच जनतेचा उद्देश असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे चार दिवस बाकी असताना काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात भाजपला ८ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी केलेल्या या मोठ्या दाव्यानंतर एकच चर्चांना उधाण आले आहे. सगळीकडे भाजपला फटका बसतोय. भाजपला राज्यात ८ जागा मिळतील तर मोदी सरकारला हटवणं हाच जनतेचा उद्देश असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. पुढे ते असेही म्हणाले, या सरकारचं अधःपतन झालंय. वाराणसीमध्ये आज साधूंच्या बैठका घ्याव्या लागतात. उत्तर प्रदेशात आम्ही ४८ जागा जिंकतो. ४ तारखेला निकाल आल्यानंतर ५ तारखेला इंडियाचं सरकार येणार असल्याचा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
Published on: May 31, 2024 01:34 PM