महाराष्ट्रात ‘मविआ’ला किती जागा? लोकसभा निकालाआधीच वडेट्टीवारांचा मोठा दावा, थेट सांगितला आकडा

| Updated on: Jun 02, 2024 | 1:32 PM

निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस बाकी असताना काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीला ३५ च्या आसपास जागा मिळतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. आम्ही ३० पेक्षा अधिक जागा... नेमकं काय म्हणाले काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार ?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस बाकी असताना काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीला ३५ च्या आसपास जागा मिळतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. आम्ही ३० पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू, महाविकास आघाडीला ३५ च्या आसपास जागा मिळतील, असा आमचा अंदाज आहे. तर दाखवण्यात येत असलेल्या एक्झिट पोलनुसार इतर राज्यातील अंदाज याचा दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आनंद घेतील. त्यांना जेवढा आनंद घ्यायचाय तेवढा घेऊ द्या, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली. विजय वडेट्टीवार पुढे असेही म्हणाले, येत्या ४ तारखेला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल. एक्झिट पोलमध्ये काही जागा कमी दाखवतात काही जास्त दाखवतात, ३५ च्या आसपास आम्ही महाराष्ट्रात असू, कर्नाटकातही आम्ही पुढे राहू, सत्तेत मोदी येत आहेत याचा २ दिवस आनंद त्यांना घेऊ द्या…. असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

Published on: Jun 02, 2024 01:32 PM
जयंत पाटील हा डबक्यात पोहणारा मासा, कुणी केली जिव्हारी लागणारी टीका?
मुंबईकरांनो आता बिनधास्त घराबाहेर पडा, कारण…,‘मध्य रेल्वे’च्या विशेष मेगा ब्लॉकबाबत मोठी अपडेट