‘…तो विषयच संपलेला’, महाविकास आघाडी फुटणार की नाही? विजय वडेट्टीवार म्हणाले…

| Updated on: May 28, 2023 | 1:32 PM

VIDEO | मोठा भाऊ, छोटा भाऊवरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार?, विजय वडेट्टीवार स्पष्टच केलं

नागपूर : मोठा भाऊ, छोटा भाऊवरून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही फूट पडणार नाही. तो विषयच संपलेला आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो आहे. महाविकास आघाडी आपली ताकद आहे आणि ती ताकद आपल्याला निवडणुकीत वापरायची आहे. आपली संयुक्त ताकद आपण म्हणतो, तेव्हा काँग्रेस कमजोर आहे? राष्ट्रवादी कमजोर आहे? आणि शिवसेना कमजोर आहे असं म्हणून चालणार नाही. आपल्याला पुढचा विचार करून मार्गक्रमण करावं लागणार आहे. आपण संयुक्तपणे लढण्याचा निर्णय जेव्हा घेतो, तेव्हा आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणणे हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हीच महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी आमदारांची आकडेवारीही दाखवली आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अजितदादांच्या म्हणण्याचं समर्थन केलं होतं. हा वाद सुरु असतानाच विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

Published on: May 28, 2023 01:32 PM
अजित पवार यांना कोणाचा सल्ला? म्हणाला, ‘आघाडी म्हणून लढायचं असेल तर धर्म पाळा’
संसद भवनाची कोणती इमारत अधिक प्रिय, जुनी की नवी?; सुप्रिया सुळे यांनी सांगितलं…