दोन मंत्र्यांना तातडीने पाठवा, लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळावरून वडेट्टीवारांचा शिंदेंना फोन
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दाखल झाले असून त्यांनी ओबीसी नेत्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. इतकंच नाहीतर वडेट्टीवारांनी उपोषणस्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि...
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघामारे यांचं जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरु आहे. दोन्ही नेत्यांचा उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघामारे यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. अशातच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दाखल झाले असून त्यांनी ओबीसी नेत्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे. इतकंच नाहीतर वडेट्टीवारांनी उपोषणस्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला आणि उपोषणस्थळी सरकारचं शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली. ‘कृपया तुम्ही दोन मंत्र्यांना इथे पाठवा. कारण इथे हजारोंच्या संख्येने फार मोठा जनसमुदाय आहे. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या.’, असे त्यांनी शिंदेंना सांगितले तर मुख्यमंत्र्यांनी आपण उद्या मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ पाठवू, असं आश्वासन वडेट्टीवार यांना दिलं.