सांगलीतील काँग्रेसचे काही नेते नॉट रिचेबल, कार्यालयाबाहेर शुकशुकाट, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Apr 09, 2024 | 2:24 PM

सांगलीतूनच मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री विश्वजीत कदम आणि सांगलीतून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असणारे विशाल पाटील हे दोघेही नॉटरिचेबल आहेत. इतकंच नाहीतर काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोरही शुकशुकाट दिसतोय.

लोकसभा सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली असून काँग्रेस पहिल्यांदाच सांगलीची जागा लढणार नसल्याचे समोर येत आहे. त्यानंतर सांगलीतील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, सांगलीतूनच मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री विश्वजीत कदम आणि सांगलीतून लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छूक असणारे विशाल पाटील हे दोघेही नॉटरिचेबल आहेत. इतकंच नाहीतर काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोरही शुकशुकाट दिसतोय. विशाल पाटील यांना उमेदवारी दिली गेली नाही. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो असे म्हणत काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतरही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. विशाल पाटील यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांसोबत विश्वजीत कदम दिल्लीला गेले. तिथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. दोनदा दिल्लीवारी करूनही फारसा काही बदल झाला नाही. आज अखेर महाविकास आघाडीच्या बैठकीत चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं.

Published on: Apr 09, 2024 02:24 PM