‘संजय राऊतांच्या अंगात आल्यानं मविआचं सरकार बनलं अन्…’, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Nov 13, 2024 | 1:03 PM

संजय राऊत यांच्या अंगात आल्यानं मविआचं सरकार बनलं, हे मी विनोदाने म्हणतो, असं वक्तव्य विश्वजीत कदम यांनी म्हटलंय तर संजय राऊत यांच्या अंगातून कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं, असंही वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केलं. सांगलीच्या कडेगाव तालुक्यात प्रचार सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं.

माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम हे सांगलीच्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. सध्या ते जोरदार प्रचार करताना दिसताय. नुकतंच विश्वजित कदम यांनी प्रचारसाठी सांगलीच्या कडेगाव तालुक्यात एक सभा आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी महाविकासाआघाडी आणि संजय राऊत यांच्यावर मिश्किल भाष्य केले. ‘२०१९ ला सरकार येईल असं वाटतंच नव्हतं. पण २०१९ ला महाविकासआघाडीचं सरकार बनलं. मी विनोदाने अनेकदा म्हणतो की संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं. पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं, असे वक्तव्य विश्वजित कदम यांनी केले. ते सांगलीच्या कडेगाव तालुक्यात प्रचार सभेदरम्यान बोलत होते. दरम्यान, विश्वजित कदम यांच्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांनी पलटवार केला. विश्वजीत कदम गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं, तर विश्वजीत कदमांनी अजित पवारांचं कालचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. अजित पवार यांनी एक काल मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं सरकार पाडण्यासंदर्भात बैठक झाली त्या बैठकीला अदानी हजर हजर होते. त्यामुळे आता कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा नीट तपासलं पाहिजे, असा हल्लाबोल केला.

Published on: Nov 13, 2024 01:03 PM
Ajit Pawar : महाराष्ट्रात 2019 मध्ये नेमकं काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या, ‘वैद्यनाथ साखर कारखाना आता…’