Amit Deshmukh : भाजपमध्ये जाणार का? अमित देशमुखांनी दिले थेट उत्तर

| Updated on: Jan 13, 2023 | 8:23 AM

सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. परंतु सरकार वैध की अवैध याचा निर्णय सर्वोच्य न्यायालयात लागणार आहे. म्हणजे राज्यात चौथे सरकार कधीही येऊ शकते, आधी पाहटेच्या शपथविधीचे सरकार आले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. आता हे तिसरे सरकार कधीही जाऊ शकते

सांगली : भारतीय जनता पक्षात जाण्याच्या चर्चेवर अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी स्पष्टच सांगितले. किती वादळे आली तरी देशमुख वाडा तेथेच राहणार आहे, असे सांगत भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पुर्णविराम दिला. सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, सध्या राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. परंतु सरकार वैध की अवैध याचा निर्णय सर्वोच्य न्यायालयात लागणार आहे. म्हणजे राज्यात चौथे सरकार कधीही येऊ शकते, आधी पाहटेच्या शपथविधीचे सरकार आले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. आता हे तिसरे सरकार कधीही जाऊ शकते, असे अमित देशमुख यांनी म्हटले.

Published on: Jan 13, 2023 08:16 AM
महाविकास आघाडीत असूनही नाना पटोले यांना का वाटतेय धोक्याची घंटा? स्पष्टच सांगितले…
Ramdas Kadam : रामदास कदम यांनी स्पष्टच सांगितले; ‘भाजपात जाणार नाही…’